मत्स्यव्यवसाय महत्वाचे निर्णय

शनीवार, March 11, 2017
मत्स्यव्यवसाय महत्वाचे निर्णय

महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा पाहता त्या किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये मासेमारी हा जिवितार्थाचा महत्वाचा व्यवसाय आहे. त्यासाठी नौकांचे नोंदणीकरण आणि मासेमारी परवान्याच्या कामकाजाचे अधिकार मत्स्य व्यवसाय विभागाकडे देण्यात आले आहेत. दोन्ही कामात सुसूत्रता आणणे आवश्यक आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या अनुसूचित क्षेत्रात असलेल्या तलावांवर ग्रामपंचायतीचाच अधिकार राहील, असे शासनाने म्हटले आहे. तसेच शंभर हेक्टर खालील तलावामधील मासेमारीचे अधिकार अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतीकडे असतील.

मुंबईमध्ये अबालवृद्धांचे आकर्षण असलेले तारापोरवाला मत्स्यालय पूर्णपणे वातानुकूलित न नूतनीकृत स्वरूपात जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. त्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. साधारणपणे रोज तीन लाख रूपयांचा महसूल त्यातून सरकारच्या तिजोरीत जमा होत आहे.