अल्पसंख्यांक विकास

शनीवार, March 11, 2017
अल्पसंख्यांक विकास

अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, समाजात सामावून घेण्यासाठी एकनाथजी खडसे यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक कल्याणकारी योजना आखल्या आहेत. शिक्षण हा प्रत्येक समाजाच्या विकासाचा मूलभूत घटक आहे. पुरेसे शिक्षण मिळाले तर कोणताही समाज प्रगतीपथावर येण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे स्थापत्य  अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी या पाच विद्याशाखांमध्ये ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

विशेष तंत्रनिकेतन  

- जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे नवीन तंत्रनिकेतन सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार तीन वर्षांचे मिळून एक हजार २० विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत.

- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ७० टक्क तर उर्वरित ३० टक्के जागा सर्वसाधारण व राखीव प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत.

- एकूण प्रवेश संख्येच्या ३० टक्के जागा विद्यार्थिनींसाठी राखीव असतील.

- तंत्रनिकेतनसाठी १३६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे टप्प्या टप्प्याने निर्माण करण्यात येतील. पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमानुसार अल्पसंख्याकांसाठी शिक्षणाच्या संधीत वाढ करणे, त्यांचा आर्थिक व कौशल्य विकास करण्याचे उद्दिष्ट आहे.

 

लक्षवेधी निर्णय

- अल्पसंख्याक संस्थांसाठी ऑनलाइन महिती भरण्याबाबता संकेतस्थळाची निर्मिती

- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास २०१४ – १५ या वर्षासाठी ३२ कोटी ५० लाख रुपये भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात आले.

- चंद्रपूर, कोल्हापूर, पनवेल आणि घनसावंगी येथे व अन्य ९ ठिकाणी अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृहे करणे प्रगतीपथावर

- अल्पसंख्याक मुलींसाठी भुसावळ येथे तंत्रनिकेतन सुरू करणे

- अमराठी शाळांमधून ऊर्दू विषय ऐच्छिक करणे

- ऊर्दू शाळांमध्ये मराठी शिकविण्याचा निर्णय

- जळगाव, भिवंडी, मालेगाव या ठिकाणी ऊर्दू घर बांधण्यास मान्यता