सामान्य माणसापर्यंत लढा

श्री. एकनाथराव खडसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. याचमुळे त्यांना शेतकरी व सामान्य जनतेच्या गरजा व समस्यांची जाणीव आणि त्याबद्दल सहानुभूती आहे. राजकीय कामांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कामांमुळे देखिल जनतेवर त्यांनी प्रभाव पाडला आहे.

सुरुवातीच्या काळात त्यांनी आपले राजकीय क्षेत्राची सुरुवात सहकारी पतसंस्थांच्या पातळीवर लोकांच्या सेवेपासून केली. ते संलग्न असलेल्या अनेक पतसंस्थांमधे त्यांनी केलेल्या कामाचा चढता आलेख दिसून येतो.

 • १९७८-८८ : जयकिसान पीक संरक्षण सहकारी संस्था , मुक्ताईनगर येथे अध्यक्ष. 
 • १९८०-९०: मुक्ताई औद्योगिक सहकारी संस्था, मुक्ताईनगर येथे संचालक
 • १९८०-२००५: विविध कार्यकारी संस्था, कोथळी येथे संचालक
 • १९८०-९०: तालुका सहकारी खरेदी विक्री संस्था,मुक्ताईनगर येथे अध्यक्ष.
 • १९८३-९५ : एदलाबाद तालुका शैक्षणिक संस्था, मुक्ताईनगर येथे मानद सचिव 
 • १९८५-९० : भुसावळ जनता सहकारी बँक, भुसावळ येथे संचालक
 • १९८३-९५: मुक्ताई औद्योगिक तेलबिया उत्पादक सहकारी संस्था,मुक्ताईनगर येथे अध्यक्ष.
 • १९८५-९५: कृषी उत्पन्न बाजार समिती , बोडवड येथे संचालक
 • १९८९-९५: मुक्ताई क्रेडीट सहकारी संस्था मुक्ताईनगर येथे अध्यक्ष.
 • १९९८: मुक्ताई सहकारी सूत गिरणी मुक्ताईनगर येथे संस्थापक अध्यक्ष.
 • १९९७: जळगाव  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव येथे संचालक
 • १९८२ ते आजपर्यंत: मुक्ताईनगर तालुका शैक्षणिक संस्था, कार्यकारी मंडळाचे सदस्य