लोकसंपर्क

दरवर्षी श्री. खडसे हे आषाढी एकादशीच्या वेळी पंढरपूर यात्रेला वारकर्‍यांसोबत जातात. गेले ३५ वर्षे ते अत्यंत भक्तिभावाने यात्रेला जात आहेत आणि यातूनच त्यांचा जनतेबद्दलचा विश्वास आदर आणि प्रेम दिसून येते. याच विश्वास व निष्ठेने ते जनतेची अविरत सेवा करत आहेत.

विरोधी पक्षनेते असतांना, ते अभ्यासू व अत्यंत हिरीरीने जनतेच्या प्रश्नांना सोडविणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. नागपूर अधिवेशनात त्यांनी सलग ८ तास ३० मिनीटे, वॅट सारख्या किचकट विषयावर भाष्य करून आपलाच विक्रम मोडला. या त्यांच्या वत्कृत्त्वबद्दल त्यांना त्याकाळचे पंतप्रधान कै. चंद्रशेखर यांनी विशेष सम्मानीत केले.

त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरूवात १९८४ साली त्यांच्याच गावी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून झाली. पुढे तो प्रवास पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व मग खासदार, असा चालू राहीला. शिवसेना व भाजपा सरकार मधे असतांना त्यांनी महत्त्वाच्या  विभागांमधे काम पाहीले. त्यामधे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री, आर्थिक व नियोजन मंत्री, सिंचन मंत्री, आदेश क्षेत्र विकसन या पदांपासून ते विरोधी पक्षनेते असे त्यांचे कार्यक्षेत्र होते.

विधानसभेतील काम

  • १९९०-९५ : महाराष्ट्र अधिवेशनात भाजपा चे प्रतोद
  • १९९०-९१: सदस्यांच्या वेतन व भत्ते च्या संयुक्त समितीचे सदस्य
  • १९९१-९२, २००५-०७: लोकलेखा समितीचे सदस्य
  • १९९३-९४: उपक्रम समिती सदस्य 
  • १९९५ : पंचायत राज समितीचे प्रमुख.
  • १९९५-९७:अर्थमंत्री व सदस्यांच्या वेतन व भत्ते च्या संयुक्त समितीचे प्रमुख, माजी सदस्यांच्या पेन्शन संयुक्त समितीचे प्रमुख
  • १९९५-२०००: महाराष्ट्र विधानसभेच्या विविध नियमाच्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य व अध्यक्ष > २००२- ०३: ग्रामीण विकास जलसंधारण व पाणीपुरवठा स्थायी समितीचे अध्यक्ष 
  • २००२: महाराष्ट्र विधानपरीषद समिती , नाफेड चे अध्यक्ष 
  • २०००-०४: भाजप विधान परीषद, महाराष्ट्र विधानसभा उपनेते
  • २००३-०४, २००७-०९, २००९-२०१३: राष्ट्रकूल संसदीय मंडळाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र विधानसभा व्यवहार सल्लागार समितीचे सदस्य.